भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान सांवता । जनमित्र पढियंता जिवलगू

nivrutti dnyaneshvar sopan sanvata | janamitra padhiyanta jivalagu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान सांवता । जनमित्र पढियंता जिवलगू ॥१॥ आसंद सुदामा विसोबा खेचर । नरहरी सोनार आदिकरुनि ॥२॥ बाप आर्तबंधु कृपाळू दीनाचा । अभिमाअन भक्तांचा न संडी कदा ॥३॥ चोखमेळा बंका भक्तवत्सल लाडका । तो बोलविला देखा आरोगणें ।४॥ वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभारु । आवडता डिंगरु केशवाचा ॥५॥ ऐसें थोरसानेम सकळ भक्त राणे । देवें आरोगणें बोलावले ॥६॥ सधूप आणि दीप तुळशीच्या माळा । पूजिलें सकळां देवरायें ॥७॥ तंव राही रखुमाबाई सत्यभामा सती । विस्तारोनि आणिती विविध बोणी ॥८॥ भोंवती भक्तमंडळी मध्यें वनमाळी । शोभे नथमंडळीं चंद्र जैसा ॥९॥ सकळांमुखीं कवळ देतसे निजकरें । उच्छिष्ट पितांबरें सांवरितो ॥१०॥ त्या सुखाचा पारु देखोनी वैकुंठीं । होती लूलूमिठी सुखराशी ॥११॥ ऐसें तें भोजन जालें खेळेमेळें । ब्रह्मरसें धाले सकळ भक्त ॥१२॥ तंव विमानें आकाशीं दाटले सकळ । करिती कल्लोळ पुष्पवृष्टी ॥१३॥ तें देखोनी द्विजवर पडिले चिंतवनी । म्हणती पैं जाली हानी जीवित्वाची ॥१४॥ नव्हे हा ज्ञानमार्ग नव्हे हें वैराग्य । नवल भक्तिभाग्य आवडीचें ॥१५॥ एक म्हणती हा पांडुरंग होय साचें । येव्हढें भाग्य कैचे मानवियां ॥१६॥ हा नव्हे गुणिवंतु क्रियाकर्मातीतु । यासी प्रायःश्चितु काय घडे ॥१७॥ नाहीं यासी आप नाहीं यासी पर । नाहीं या आचार जातिकूळ ॥१८॥ षड्रमार्ग संबंध नाहीम याच्या ठायीं । विकल्पाचें नाहीं वळण कदाम ॥१९॥ कृपेचा कोंवळ सोयरा दीनांचा । उदार मनाचा लोभापर ॥२०॥ अनुसरे त्याचेम मायाजाळ तोडी । बैसणें तो मोडी संसाराचे ॥२१॥ या नामयाची माता आम्हां तुम्हां देखतां । शिणली वेवादतां नानापरी ॥२२॥ नेदी तिच्या हातीं घातिला पाठीसी । धरिला जीवेंसी माझा म्हणुनी ॥२३॥ देहाचा विसरु याच्या रुपाच्या दर्शनें । चरणाचेनि स्मरणें चित्त निवे ॥२४॥ सुख गोष्टी यासी केलिया एकांत । तेणें पुरतसे आर्त जन्ममरणा ॥२५॥ ऐसें त्याचें बोलणें ऐकोणि पंढरिनाथें । दिलें सकळिकांतें अभयदान ॥२६॥ मग निजरुप दाविता जाला तयावेळीं । नामा ह्रदयकमळीं आलिंगिला ॥२७॥