भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढें मुक्ताबाई

nivrutti dnyanadev ubhe dohinkade | sopan to pudhen muktabai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढें मुक्ताबाई ॥१॥ देहुडे सुरगण थक्त पडिलें लोकां । सुरु केला डंका वैकुंठींचा ॥२॥ चक्रतीर्थीं उभे देव साधुजन । करविलें स्नान ज्ञानदेवा ॥३॥ देवाचें हें तीर्थ घेतलें ज्ञानेश्वरें । केला नमस्कार पादपद्मीं ॥४॥ विठठल रुक्मिणी ऋषि सुरवर । पूजा ज्ञानेश्वर करितसे ॥५॥ नामयाच्या हातीं गंध अक्षता । पूजा महंता मान्य जाली ॥६॥