भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरेची

nivrutti nivrutti | mhanatan pap nurechi

रचनाकार: संत सेना · अभंग
निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरेची ॥१॥ जप करितां त्रिअक्षरीं । मुक्ती लोळे चरणावरी ॥२॥ ध्यान धरितां निवृत्ती। आनंदमय राहे वृत्ती ॥३॥ सेना म्हणे चित्तीं धरा। स्मरता चुके येरझार ॥४॥