भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळिये मंडळीं । निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी । ध्यानरुपा

niliye mandalin | nilavarna sanvali | tethen vedhalise bali | dhyanarupa

निळिये मंडळीं । निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी । ध्यानरुपा ॥१॥ वेधु वेधला निळा । पाहे घननीळा । विरहणीं केवळा । रंग रसनें ॥ध्रु०॥ नीळवर्ण अंभ । नीळवर्ण स्वयंभ । वेधें वेधु न लभे । वैकुंठींचा ॥२॥ ज्ञानदेव निळी । ह्रदयीं सांवळी । प्रेमरसें कल्लोळीं । बुडी देत ॥३॥