भजनी मालिका

भजने

नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी । होता लपोनिया आपुलीये कुसीं । कांहिंचि नाळखुनि आपआपणासि । तोचि येउनि येथें जाला अविनशी वो ॥१॥ रुप धरिलें सगुण चांगलें । ठाणमाण माण जेथील तेथेंचि रेखीलें । चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें । मुगुट माळा श्रवणीं सुतेज कुंडले वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥ आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे ॥१॥ आपलिच आवडी धरून खेळिया । आपआपणातें व्यालेंरे । जोपनाकारणें केली बायको । तिणें येवढें वाढीवलेंरे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नव्हे माझें कांहीं नेणे तुजविण । दुजे वोझें घेऊनि जड बहु ॥१॥ रंग नानासूत्रिं अनेक पुतळे । तैसा तुझा खेळ नकळे कोण्हा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नव्हे हे सांगितली मात । महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥ जीवा जीवपणा वंग । तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥ म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ