भजनी मालिका
← भजनांकडे परत

नसता गुण स्वाभाविक । वस्तूचि तरि निरर्थक

nasata gun svabhavik | vastuchi tari nirarthak

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नसता गुण स्वाभाविक । वस्तूचि तरि निरर्थक ॥१॥ तेवीं देवा देवपण । नसतां अंगीं तो पाषाण ॥२॥ विना परिमळें । कस्तुरी मृतिकाचि तें निजनिर्धारीं ॥३॥ निळा म्हणे न मारी जिवा । तरी तें विषचि नव्हे तेव्हां ॥४॥