भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हे हे सांगितली मात । महिमाचि अदभुत सद्गुरुचा

navhe he sangitali mat | mahimachi adabhut sadgurucha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नव्हे हे सांगितली मात । महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥ जीवा जीवपणा वंग । तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥ आपुलीये मूळ निरासी । नांदवी ज्यासी हातीं धरी ॥३॥ निळा म्हणे करितां सेवा । ऐसिया दैवा पात्र करी ॥४॥