भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन

navhen ten posanen navhe ten sadhan

नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन । उपदेशखुण वेगळीं रया ॥ १ ॥ न भेदें पालथें वज्रें मढियेलें । जीवन घातलें न भरें घटीं ॥ २ ॥ नाइके उपदेश नव्हे खुण सिद्ध । योनिसी प्रसिद्ध मढियेले ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे जरीं कृपा करि श्रीगुरु । तरिच हा संप्रधारु घरीं आम्हां ॥ ४ ॥