भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी

navhen ten sagun navhe ten nirgun | janati he khun tattvadnyani

रचनाकार: संत नरहरी · अभंग
नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥ आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥ म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना अक्षर । परेहुनी परात्पर ब्रह्म जैसें ॥ ३ ॥