भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार

airavati bahu thor | tyala ankushacha mar

रचनाकार: संत नरहरी · अभंग
ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ॥ १ ॥ व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ॥ २ ॥ सर्पविष हो विखार । मंत्रवल्ली केली थोर ॥ ३ ॥ देह जठराग्नी भारी । अन्नपाणी शांत करी ॥ ४ ॥ गुरु गैबीनाथ । नरहरी दास हा अंकित ॥ ५ ॥