भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला

uth ba hoy jaga paha vasudevala sudin ugavala dan apule ghala

रचनाकार: संत नरहरी · अभंग
ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला ॥ १ ॥ आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥ २ ॥ ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर । भक्तासी भय नाहीं संत संगती घर ॥ ३ ॥ संसार सार नोहे माया मृगजळ भास । क्षणांत भ्रांती याचा काय विश्वास ॥ ४ ॥ घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास । सावधान नरहरी मालो चरणीं निजध्यास ॥ ५ ॥