भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हो अविश्वासी तैसे । आधम जैसे कृतघ्न

navho avishvasi taise | adham jaise krutaghna

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नव्हो अविश्वासी तैसे । आधम जैसे कृतघ्न ॥१॥ केले उपकार ते संती । आठवूं चित्तीं प्रीतीनें ॥२॥ तेचि करिती साभिमानें । सत्य वचनें आपुलीं ॥३॥ निळा म्हणे न सांडू वाट । दाविली नीट संती ते ॥४॥