भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी । होता लपोनिया आपुलीये कुसीं । कांहिंचि नाळखुनि आपआपणासि । तोचि येउनि येथें जाला अविनशी वो

navhate ek na dusaren kanhin yasi | hota laponiya apuliye kusin | kanhinchi nalakhuni apaapanasi | tochi yeuni yethen jala avinashi vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी । होता लपोनिया आपुलीये कुसीं । कांहिंचि नाळखुनि आपआपणासि । तोचि येउनि येथें जाला अविनशी वो ॥१॥ रुप धरिलें सगुण चांगलें । ठाणमाण माण जेथील तेथेंचि रेखीलें । चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें । मुगुट माळा श्रवणीं सुतेज कुंडले वो ॥२॥ नव्हता गांवसीव पहिला यासि कांही । नामरुपासि तो आधीची ठाव नाहीं । म्हणती वैकुंठ तें कालिची जालें बाई । क्षीरसागर ना कैंचि शेषशाई वो ॥३॥ नव्हता काळागोरा खुजा ना ठेंगणा । स्‍वरुपसुंदर ना आंधळा देखणा । कैंचि जीवशिव तयासी भावना । पंचभौतिक ना नेणें पंचप्राणा वो ॥४॥ नव्हता मन बुध्दि इंद्रियांचा मेळा । कार्यकर्तृत्व हा कारण वेगळा । येणें जाणें यासी नव्हतें कवण्या काळा । तोचि आला या नंदाच्या राउळा वो ॥५॥ यासी जीवेंभावें धरा घाला मिठया । ऐशा बोलती गौळणी गोरटया । निळा म्हणे अवघ्या मिळोनि लहानामोठया । यासि चुकती त्या अभाग्या करंटया वो ॥६॥