भजनी मालिका

भजने

धरसी संसारासी हांव । माझें माझें म्हणशी सर्व । हें तंव कोणाचें वैभव । तुज न कळे पामरा ॥१॥ आयुष्यमान जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म । अंतकाळीं जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धरा अधर जाली वोटंगणें काई । जळे मळें तें धावें कवणे ठायीं ॥१॥ ऐसा कोण्हीहा गुणीया मिळों कां निरुता । भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धरा सतराचा हो मेळा कारखाना झाला गोळा वाजविती आपुल्या कळा। प्रेमबळा आनंदें ।।१।। झडतोनामाचाचौघडाब्रह्मीब्रह्मरूपीचाहुडासंतऐकतातीकोडांप्रेमबळाआनंदे||२||

रचनाकार: संत जनाबाई

धराल जरी चित्तीं न लगेचि तरी वेळ । आहेती सकळ कळा हातीं ॥१॥ क्षणेचि सगुण क्षणेंचि निर्गुण । क्षणेंचि प्रसन्न होतां दासा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धराल तरी धराल चित्तीं । संशय निवुत्ती करुनियां ॥१॥ या हो विठोबाच्या नामें । साधनें दुर्गमें लाजविलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी ॥१॥ वायां काय बळ वेंचितोंसी मुढा । न सुटतां हातीं हात वायां जिनें दगडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धरिती ज्या हातीं संत कृपावंत । पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ॥१॥ न विसंबे त्या घडी पळ युग मानी । दिसों नेदी जनीं किविलवाणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ