भजनी मालिका
← भजनांकडे परत

धराल तरी धराल चित्तीं । संशय निवुत्ती करुनियां

dharal tari dharal chittin | sanshay nivutti karuniyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धराल तरी धराल चित्तीं । संशय निवुत्ती करुनियां ॥१॥ या हो विठोबाच्या नामें । साधनें दुर्गमें लाजविलीं ॥२॥ सहजचि उच्चार करितां वाचे । सायुज्याचे अधिकारी ॥३॥ अनन्यभावें शरणागत । होतां पतित उध्दरिले ॥४॥ न मागोनियां धन संपत्ती । भाव भक्तिी भुकेला ॥५॥ निळा म्हणे अंतर जाणे । अधम न म्हणे उत्त्म हा ॥६॥