भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरा अधर जाली वोटंगणें काई । जळे मळें तें धावें कवणे ठायीं

dhara adhar jali votanganen kai | jale malen ten dhaven kavane thayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरा अधर जाली वोटंगणें काई । जळे मळें तें धावें कवणे ठायीं ॥१॥ ऐसा कोण्हीहा गुणीया मिळों कां निरुता । भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥ अग्नि हिवेला तापावें कोठें । पवना प्राणु नाहीं कवण लावी वाटे ॥३॥ गगन हारपलें पाहावेआं कवणे ठायीं । मन मुळीं लागलें शांतीक तें पाहीं ॥४॥ स्वादें जेवणार गिळिला पैं जाणा । चवी सांगावया सांग ते कवणा ॥५॥ एका जनार्दनीं जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी घ्या एकपणें ॥६॥