भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा

dhara sataracha ho mela | karakhana jhala gola

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा । वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥ झडतो नामाचा चौघडा । ब्रम्ही ब्रम्हारूपीचा हुडा । संत ऐकताती कोडां । प्रेमबळा आनंदें ॥२॥ नामदामा दोनी काळू । नामा विठा दमामे पैलू । चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥ गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी । आऊबाई तुतारी । मंजुळस्वर उमटती ॥४॥ गोणाबाई नोबतपल्ला । नाद अंबरीं कोंदला । राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटला ॥५॥ जनाबाई घडयाळ मोगरीं । घटका भरतां टोला मारी । काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदें ॥६॥