भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरा अंतरीं शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला

dhara antarin shuddha nishtha | paha shreshtha viththala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरा अंतरीं शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला ॥१॥ वाचें उच्चरितां सहज । अधोक्षज तोषतो ॥२॥ सहज अमृत पडतां मुखीं । होय शेखीं अमर तो ॥३॥ नामामृत घेतां वाचे । कोटी जन्मांचे सार्थक ॥४॥ एका शरण जनार्दनीं । घेत नामामृत संजीवनीं ॥५॥