भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरितां श्रीहरींचें ध्यान । समाधीस समाधान

dharitan shriharinchen dhyan | samadhis samadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरितां श्रीहरींचें ध्यान । समाधीस समाधान ॥१॥ तो सोपा आम्हांलागी । उघडा पहा धन्य जगीं ॥२॥ कीर्तनीं नाचतो भक्तामागें । मन वेधिलें या श्रीरंगें ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची भेटी । झालिया होय जन्ममरण तुटी ॥४॥