भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरिसी देहाची तूं आशा । तेणें फांसा पडशील

dharisi dehachi tun asha | tenen phansa padashil

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरिसी देहाची तूं आशा । तेणें फांसा पडशील ॥१॥ सोडविता नाहीं नाहीं कोण्ही । पाहें विचारुनी मनामाजी ॥२॥ येती तैसे सवेंचि जाती । व्यर्थ कुंथती माझें माझें ॥३॥ एका जनार्दनीं पैलपार । तरसी निर्धार विठ्ठलनामें ॥४॥