भजनी मालिका

भजने

दुस्तर सायास न करीं । वाचे म्हणे हरिहरी । वैकुंठ पायरी । सोपी तेणें ॥१॥ तें नाम विठोबाचें । सुलभ वदें कां रे वाचे । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दूत विनविती कर जोडुनी । म्हणती आरुढावें विमानीं । । १ ।। ऋषि म्हणे न घडे ऐसें । ह्याची तृप्ति नाहीं आस ।। २ ।।

रचनाकार: संत जनाबाई

दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळ भेद ॥१॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दृश्य तो जोगिळी देखणें कवळी । दृष्टी ज्याचें मेळी समरस होय ॥१॥ लक्षालक्ष भेदी निरसी उपाधी । महाशून्य पदीं पैठा होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दृष्टि उघडुनि नामा भोंवती जंव पाहे । तंव पुढें माय देखियेली ॥१॥ म्हणे मजशीं नाम्या वैर कां साधिलें । बहुत दुःख जालें कोणा सांगों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां ॥१॥ ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाहीं दुजी उपमा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दृष्टीचें देखणें तेचि रूपमाया । शब्द बोलावया ज्ञान झालें ॥१॥ ज्ञानांची जी जागा ह्लदयीं पाहावी । सत्रावीसी दावी खेळ तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव