भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टी देखावासाचि वाटे । हदय फुटे त्यालागीं

drushti dekhavasachi vate | haday phute tyalagin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दृष्टी देखावासाचि वाटे । हदय फुटे त्यालागीं ॥१॥ उभा कटावरी कर । मूर्ती सकुमार गोमटी ॥२॥ भेटीलागीं मन व्याकूळ । न लोटे पळ युग वाटे ॥३॥ निळा म्हणे न तुटे आधी । कृपानिधी न भेटतां ॥४॥