भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृढभाव हृदयीं धरा । वाचे स्मरा विठ्ठ्ल

drudhabhav hrudayin dhara | vache smara viththla

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दृढभाव हृदयीं धरा । वाचे स्मरा विठ्ठ्ल ॥१॥ मग तुम्हां काय उणें । होय पेणें वैकुंठ ॥२॥ धरा सत्यसमागम आवडीं । कीर्तनपरवडीं नाचावें ॥३॥ एका जनार्दनीं श्रोतें । एकात्मतें पावाल ॥४॥