भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृश्य तो जोगिळी देखणें कवळी । दृष्टी ज्याचें मेळी समरस होय

drushya to jogili dekhanen kavali | drushti jyachen meli samaras hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दृश्य तो जोगिळी देखणें कवळी । दृष्टी ज्याचें मेळी समरस होय ॥१॥ लक्षालक्ष भेदी निरसी उपाधी । महाशून्य पदीं पैठा होय ॥२॥ मन पवन गांठीं संगम गोल्हाटीं । तूर्या औटपिठीं स्थिर करी ॥३॥ मनाचें उन्मन जनार्दनीं खूण । यालागीं शरण एकनाथ ॥४॥