भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टिमाजी रुप लखलखीत देखलें

drushtimaji rup lakhalakhit dekhalen

दृष्टिमाजी रुप लखलखीत देखलें । अव्यक्त ओळखिलें तेजाकार ॥१॥ सांवळे सुंदर रुप बिंदुलें । मन हे मुरालें तयामाजी ॥२॥ अणुरेणु ऐसें बोलती संतजन । ब्रह्मांड संपूर्ण तया पोटीं ॥३॥ निवृत्तीची खूण ज्ञानदेव पावला । सोयरा लाधला निवृत्तिकृपें ॥४॥