भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें

drushya sanduniyan magen | vrutti geli lagavegen

रचनाकार: संत रामदास · अभंग
दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें ।। माया सांडूनी चंचळ । जाला स्वरूपीं निश्चळ ।। कांहीं भासचि नाडळे । वृत्ति निर्गुणीं निवळे ।। चराचरातें सांडिलें । बहुविधें ओलांडिलें ।। अवघें एकचि निर्गुण । पाहे वृत्तिच आपण ।। रामदास सांगे खूण । वृत्ति तुर्येचें लक्षण ।।