भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृश्य नेणती आभास । अवघा बहमींचा प्रकाश

drushya nenati abhas | avagha bahamincha prakash

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दृश्य नेणती आभास । अवघा बहमींचा प्रकाश ॥१॥ तया नाहीं दुजी परी । एकावीण उरली हरी ॥२॥ अवघेंचि नेणोनि जाणते । अवघ्या राहिले आंतौते ॥३॥ निळा म्हणे जनीं वनीं । अवघ्या अंगें जनार्दनीं ॥४॥