भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुस्तर सायास न करीं । वाचे म्हणे हरिहरी । वैकुंठ पायरी । सोपी तेणें

dustar sayas na karin | vache mhane harihari | vaikunth payari | sopi tenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुस्तर सायास न करीं । वाचे म्हणे हरिहरी । वैकुंठ पायरी । सोपी तेणें ॥१॥ तें नाम विठोबाचें । सुलभ वदें कां रे वाचे । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥ प्रचीत पाहे अर्धक्षण । नाम उच्चारी रे जाण । तेणें तुटे भवबधन । यमदुतांचें ॥३॥ नाम घेतां उठाउठीं । पातकाच्या पळती थाटी । पुर्वज उद्धरती कोटी । बेचाळिसासहित ॥४॥ एका जनार्दनीं प्रेम । गाईं तूं विठ्ठल नाम । आणिक सोपें वर्म । नाहीं नाहीं ॥५॥