भजनी मालिका

भजने

दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥ विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥ तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणों यासि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥ समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेगाळले गुणें धांव घेती ॥१॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दिवट्या वाद्य लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥ नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम