भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यांत न पडे

divatya chhatri ghode | hen ton baryant na pade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यांत न पडे ॥१॥ आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥ मान दंभ चेष्टा । हे तों शूकराची विष्ठा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धांवा ॥३॥