भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा

dinacha krupalu dushtajana kal | ekala sakal vyapak ha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणों यासि ॥२॥ यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥ धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥ गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥ न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥ वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥