भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें

dinedine shanka vate | ayushya nenavatan gadhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ विसरला मरण । त्याची नाहीं आठवण ॥२॥ देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥३॥