भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिंडी आणि पताका गरुड टकियाचे भार

dindi ani pataka garud takiyache bhar

रचनाकार: संत बोधले · अभंग
दिंडी आणि पताका गरुड टकियाचे भार । आनंद गर्जती नाम यादव वीर ॥१॥ ॥ध्रु॥ चलावे विंठोबा राजमंदिरी । करी घेऊनि चामर ढाळिती गा सुंदरा । वेडे आणि वाकुडे गर्जती हरिचे पवाडे । भक्तीचा आळुका उभा भाग आणि पुढा ॥ २॥ घातला मंचक कळि सुमने बरुवार । आनंद पहुडले वरि यादव वीर ॥३॥ सकळिका मिळोनि वरि जाणविती वारा । ऐका परिसा येक त्या दिसती सुंदरा ॥४॥ सुवर्णाचे ताटी आर या गोपिका येती । बोधला म्हणे मी तेथे चरण तळाची ॥५॥