भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिवट्या वाद्य लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं

divatya vadya lavuni khanen | karuni mandan dili hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिवट्या वाद्य लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥ नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥ गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥ करूं द्यावें व्हावें बरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥ वर्‍हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटि का तेलीं ॥४॥ तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥