भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिनांचा दयाळू पतितांचा पावन

dinancha dayalu patitancha pavan

रचनाकार: संत बोधले · अभंग
दिनांचा दयाळू पतितांचा पावन । सर्वसुखनिधान पांडुरंग ॥१॥ घडी घडी आठव करावा तयांचा । धोका कळीकाळाचा नाही त्यासी ॥२॥ पांडव जयाने रक्षीले जो हरि । ते नेले विवरी काढूनिया ॥३॥ प्रल्हादाचा पिता चिंतीत वोखटे । करितसे गोमटे वेगळाची ॥४॥ बांधोनी पाषाण सागरी लोटिला । तो पहा तारिला वरचेवरी ॥५॥ जैसे आणिक पतित बहु उध्दरिले । आठवा रे पाऊले त्यांची वेगी ॥६॥ बोधला म्हणे ऐशा देवा शरण जावे । भवसागर तरावे हेळामात्रे ॥७॥