भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे

dinarajanin hachi dhanda | govindache pavade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥ संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥२॥ कीर्ती मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥