भजनी मालिका

भजने

थोर पीडीयेलें सांगतां नये आम्हां । दहीं दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥ लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविलें सबळ ॥३॥

रचनाकार: संत एकनाथ

दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊं नेदी ॥१॥ वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दग्धही होतसे आलें जें आकारा । असोनि निर्धारा नाम नाहीं ॥१॥ नाम अनुभवे प्रपंचि हो ब्रह्म । जाहला सर्वोत्तम संत कृपें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दंडकारण्याभीतरी गोदावरी तीरी बाभुळगांव ग्राम चेक जाणा ।।१।। तथा ग्रामी राहती रजपूत ते वंशी हरीशींग लक्ष्मी जाणा ||२||

रचनाकार: संत विठाबाई

दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें ॥१॥ मनें चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥ दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दत्तराया करुं प्रथम नमन । द्वीतीय चरणां सदगुरुच्या ॥१॥ सदगुरुच्या चरणां करावा प्रणाम । मुखीं नित्य नाम सद जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ