भजनी मालिका
← भजनांकडे परत

दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं

dakshin dvaraka pandhari | shobhatase bhimatirin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥ चला जाऊं तया ठायां । वंदू संताचिया पायां ॥२॥ नाचुं हरुषें वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥