भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त नामाचा उच्चार । मुखीं वास निरंतर

datta namacha uchchar | mukhin vas nirantar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त नामाचा उच्चार । मुखीं वास निरंतर ॥१॥ तयापाशी शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥ सर्व सुखें तयापाशी । ऋद्धिसिद्धि त्याच्या दासी ॥३॥ भुक्ति मुक्ति लोटांगणीं । लागताती त्या चरनीं ॥४॥ म्हणे एका जनार्दनीं । मना लागलेंसे ध्यान ॥५॥