भजनी मालिका
← भजनांकडे परत

दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊं नेदी

dagadachya deva bagadi navas | bail kathes jaun nedi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊं नेदी ॥१॥ वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥ चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्वीजा हातीं नेदी रुका ॥२॥ करी पाहुणेर व्याह्याजावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥ तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण धरातळी ॥४॥