भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी

datta vase audumbarin | trishul damaru jatadhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥ कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥ गोदातीरीं नित्य वस्ती । अंगीं चर्चिली तिभुती ॥३॥ काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळीं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । रात्रंदिनीं आठवित ॥५॥