भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें

datta datta mhanatan vache | tenen sarthak janmanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें ॥१॥ मनें चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥ दत्तरुप पाहे डोळां । तेणें भय कळिकाळा ॥३॥ एका जनार्दनीं जपा । मंत्र द्वयाक्षरीं हा सोपा ॥४॥