भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत

datta majha dinanath | bhaktalagin ubha satat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥ त्रिशुळ घेऊनियां करीं । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥ भाळीं चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥ जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । रुप राहिलें हृदयांत ॥५॥