भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचें

datta datta mhane vache | kal pay vandi tyachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचें ॥१॥ दत्तचरणीं ठेवी वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥ दत्तरुप पाहे डोळां । वंद्य होय कळिकाळा ॥३॥ एका जनार्दनीं दत्त । हृदयीं वसे सदोदित ॥४॥