भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय

datta majhi may | amhan sukha unen kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥ नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥ दत्ताविण नसे दुजें । दत्त मायबाप माझें ॥३॥ दत्तात्रय दत्तात्रय । नाहीं कळिकाळाचें भय ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥