भजनी मालिका
← भजनांकडे परत

दत्त दत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक

datta datta vadatan vache | hoy janmachen sarthak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दत्त दत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥ ऐसा जया नामीं वेधु । परमानंदु हृदयीं ॥२॥ दत्त आलिंगनीं समाधान । तेणें नासे मीतूपण ॥३॥ एका जनार्दनीं वेधु । दत्तनामें लागला छंदु ॥४॥