भजनी मालिका

भजने

ऐके गा हृषीकेशी । जाणोनि तुं विश्वासी । निजगुह्मा तुजपाशी । ठेवणें दिधलें ॥१॥ आम्हां चाळवोनि विषयासी । थितें बुडवूं पाहासी । क्रियानष्ट होसी तूंचि येक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐके गोणाई म्हणे केशिराज । सदा अरज तुझें नामदेवा ॥१॥ संसारादि यासी नावडेचि कांहीं । मिठीच वो पायीं घातलीसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐके गोणाई म्हणे केशिराज सदा अरज तुझें नामदेवा ।।१।। संसारादि यासी नायडेचि कांहीं मिठीच वो पायीं घातलीसे ||२||

रचनाकार: संत गोणाई

ऐके देवा सावधान । एवढे पुरवावें जाण । दुधावांचुनी दुसरें आन । न मागे मी सर्वथा ॥१॥ मातापिता उपमन्यु । तिघे गरुडावर बैसून । क्षीरसागरीं नेऊन । इच्छा त्यांची पुरविली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । झालों मी सेवक दास तुझा ॥१॥ कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐकोनि ऐसीं नांवें हासिन्नले ब्राह्मण । नामांचें अभिधान सांगा आम्हां ॥१॥ येक म्हणती नामापाशीं काय आहे । ज्ञाना वाहात आहे पखालीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकोनि संतकीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाहीं पुनरावृत्ती । जन्माची तया ॥१॥ धन्य धन्य संतजन । मज केलें वो पावन । विश्रांतीचें स्थान । हृदयीं माझ्या ठसविलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकोनियां ऐसें कोमल उत्तर । भक्त करुणाकर काय करी ॥१॥ अढळ ते पदीं स्थापियेला बाळ । जाहला जयजयकार तयेवेळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकोनियां कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचें ॥१॥ म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकोनिया कानीं अचळीं भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापाशीं ॥१॥ शालिवाहन शके बाराशें साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं ॥१॥ तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ