भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनि ऐसीं नांवें हासिन्नले ब्राह्मण । नामांचें अभिधान सांगा आम्हां

aikoni aisin nanven hasinnale brahman | namanchen abhidhan sanga amhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकोनि ऐसीं नांवें हासिन्नले ब्राह्मण । नामांचें अभिधान सांगा आम्हां ॥१॥ येक म्हणती नामापाशीं काय आहे । ज्ञाना वाहात आहे पखालीसी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा । वेगळिक आम्हां तया नाहीं ॥३॥ मारिती आसुड म्हैशियाचे पाठीं । तोचि वळ उठे ज्ञानदेवा ॥४॥ म्हणती द्विजवर अहो ज्ञानदेवा । यापासोनी उच्चारावा वेदध्वनी ॥५॥ तरीच तुमची समता आम्हां येईल कळों । नाहीं तरी बोलों नका कांहीं ॥६॥ ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद । ओंकार मूळशब्द प्रणवाचा ॥७॥