भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनि बोल हांसे त्यांचे

aikoni bol hanse tyanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐकोनि बोल हांसे त्यांचे । म्हणे हे बेटयाचे पोट पोसे ॥१॥ आयतें आणूनि द्यावें हातीं । मग हे सेविती स्वानंदें ॥२॥ तयां म्हणे यारे लागे । माझिया मागें चोजवित ॥३॥ निळा म्हणे पाळतिही करी । आपणचि चोरी वाटी त्या ॥४॥