भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां ऐसें कोमल उत्तर । भक्त करुणाकर काय करी

aikoniyan aisen komal uttar | bhakta karunakar kay kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनियां ऐसें कोमल उत्तर । भक्त करुणाकर काय करी ॥१॥ अढळ ते पदीं स्थापियेला बाळ । जाहला जयजयकार तयेवेळीं ॥२॥ नुठवे दुजी आई ऐसा स्थापियेला । आपण निघाला वैकुंठासी ॥३॥ एका जनार्दनीं भक्ताचें चरित्र । स्वयें राजीवनेत्र वदतसे ॥४॥